• call us
  • Mail us

मतिमंद मुलांसाठी निवाशी प्रवेश सुरू!! संपर्क करा:9527439777

WELCOME TOसुस्वागतम  

मति मंद (बौद्धिक दिव्यांग) मुलांसाठीच्या शाळा

(Matimand School) या कमी बौद्धिक क्षमता 

असलेल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष शिक्षण,

 निवासी सुविधा (Hostel),

आणि व्यावसायिक प्रशिक्षण (Vocational Training) देतात.

या शाळांमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन दैनंदिन

जीवनातील कौशल्ये (ADL) शिकवली जातात..

 
 

मतिमंद शाळांची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • विशेष शिक्षण: बौद्धिक पातळीनुसार सोप्या पद्धतीने शिक्षण.
  • निवासी सुविधा: बऱ्याच शाळांमध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय असते (उदा. गेवराई, बीड).
  • व्यावसायिक प्रशिक्षण: हस्तकला, मेणबत्ती बनवणे, शेती, किंवा इतर लहान उद्योग शिकवले जातात, जेणेकरून मुले स्वावलंबी होऊ शकतील.
  • पालक समुपदेशन: मुलांच्या संगोपनासाठी पालकांना मार्गदर्शन
 

प्रवेश प्रक्रिया:
सामान्यतः, अशा शाळांमध्ये प्रवेशासाठी वयाची अट (उदा. ६ ते १८ वर्षे) आणि वैद्यकीय प्रमाणपत्र (बुद्धिगुणांक - IQ तपासणी) आवश्यक असते

 

 

विशेष शिक्षण : 

दिव्यांग मुलांना अतितीव्र अपंगत्वामुळे सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षण घेता येत नाही.  आमच्या शाळेच्या माध्यमातून विशेष गरजा असणा­या मुलांना विशेष शिक्षण दिले जाते.  प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या बौध्दीक क्षमतेनुसार विशेष शिक्षणाद्वारे शिक्षण दिले जाते.  मानसोपचार तज्ञ, थेरपीस्ट यांच्या माध्यमातून मुलांना येणा­ऱ्या अडचणी व त्यावरील उपचार हयातून शारीरिक व मानसिक विकास केला जातो. तसेच दररोज योग, प्राणायाम, ध्यानधारणा, व्यायाम करून घेतले जातात व सण उत्सव, कला­क्रिडा यामध्ये सहभागी करून घेतले जाते.

 

आरोग्य : मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना उत्तम पोषण आहार व जीवनसत्वयुक्त पदार्थ दिले जातात . मुलांच्या वैयक्तीक स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. मुलांच्या आरोग्या विषयी पालकांना मार्गदर्शन केले जाते. अपंगत्व येवू नये यासाठी अपंगत्व प्रतिबंधात्मक जनजागॄती कार्यक्रम शाळेच्या मार्फत राबविले जातात. मुलांची नियमीतपणे वैद्यकीय तपासणी केली जाते..

 

आमच्या संस्थेतील शिक्षक, थेरपिस्ट आणि सेवाभावी कर्मचारी विशेष मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. आमच्या संयुक्त प्रयत्नांमधून एक समावेशक आणि सक्षम समाज निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. 

 

विशेष शिक्षण व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण 

प्रत्येक विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिकवले जाते. आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. 

The Numbers Say it All

Why Choose Us

 
Certified Courses
 
Students Enrolled
 
Academics
100
Satisfied Students

 

प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता

  संस्थेत 6 ते 18 वयोगटातील मतिमंद विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

प्रत्येक विद्यार्थ्याची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन त्याला योग्य ती मदत व शिक्षण दिले जाते.

  शासनमान्य अभ्यासक्रमासोबतच जीवन कौशल्ये, स्वावलंबन, आणि विविध थेरपीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवले जातात.

 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:

 दिव्यांग प्रमाणपत्र – जिल्हा रुग्णालय किंवा अधिकृत वैद्यकीय मंडळाने दिलेले प्रमाणपत्र आवश्यक.

जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला – अधिकृत जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा मागील शाळेचा दाखला.

  आधारकार्ड / रहिवासी दाखला – विद्यार्थी व पालक यांचा ओळख व पत्त्याचा पुरावा.

  जातीचा दाखला – आवश्यक असल्यास, समाजकल्याण विभागाकडून प्रमाणित दाखला.

 पासपोर्ट साईज फोटो – ५ (विद्यार्थ्याचे व पालकांचे).

 पालकांचा विनंती अर्ज – पालकांनी संस्थेत प्रवेशासाठी दिलेला अधिकृत अर्ज.

  टीप: प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे वेळेत जमा करावीत. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता, आरोग्य स्थिती आणि स्वावलंबनता तपासून प्रवेश निश्चित केला जातो.

Managment

President (Meera Dharmaraj Jarange)

Secretary (Dharmaraj Vishnu Jarange)

Vice President (Bhausaheb Vitthalrao Modke)

Member (Jayshree Bhausaheb Modke)

Member (Hanuman Ashraji Jarange)

Joint Secretary (Sunil Prabhakar)

Member (Gokul Bansode)

Admission Form